'मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियान' ; यशस्वीतेसाठी वालावल ग्रामस्थांची प्रतिज्ञा

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: September 17, 2025 16:16 PM
views 31  views

कुडाळ : 'मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियान' यशस्वी करण्यासाठी वालावल ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेत जोरदार प्रतिसाद दिला. बुधवार, दिनांक १७/०९/२०२५ रोजी वालावल ग्रामपंचायत सभागृहात या अभियानावर चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभा पार पडली. या सभेला ११३ ग्रामस्थांची उपस्थिती होती.

यावेळी सरपंच श्री राजा प्रभू, अभियान संपर्क अधिकारी श्री गोविंद चव्हाण, आणि तलाठी सौ. मयेकर मॅडम यांनी ग्रामस्थांना अभियानाची माहिती दिली. सरपंच प्रभू साहेबांनी ग्रामस्थांना या अभियानात सक्रियपणे सहभागी होऊन ते यशस्वी करण्याचे आवाहन केले.

सभेला उपसरपंच सौ. पूर्वा आडेकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. समीक्षा गोवेकर, सौ. शुभदा कुंडेकर, सौ. यशश्री वालावलकर, सौ. साक्षी कवठणकर, सौ. प्राची हळदणकर, मनोज पाटकर, राजू बंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच, वालावल गुरुजी, बाबा आडेकर, अरुण मेस्त्री, चंदू देसाई, दाजी कावळे, ललितकुमार प्रभू, पोलीस पाटील रघु हळदणकर, समीर वालावलकर, रवींद्र गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष चंदू वालावलकर, सी.आर.पी. सौ. गीतांजली वालावलकर, ग्रामसंघ अध्यक्ष सौ. प्राची राऊळ, ग्रामसंघ सचिव सौ. उमा प्रभू, माजी सदस्य दर्शना बंगे, दीपिका वालावलकर, वालावल ग्रामपंचायतचे कर्मचारी, प्राथमिक शाळांचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गट प्रतिनिधी आणि गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ग्रामस्थांच्या या विशेष उपस्थितीबद्दल सरपंच प्रभू साहेबांनी समाधान व्यक्त केले आणि सर्वांचे अभिनंदन केले. त्यांनी सर्वांना हे अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.