
सावंतवाडी : 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज' अभियान हे ग्रामविकासासाठी वरदान ठरणार असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनासोबतच जनतेची ही सहकार्य तेवढेच गरजेचे आहे असे मत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केले. आजगाव येथे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते ऑनलाईन मार्गदर्शन करताना म्हणाले.
आजगाव येथे आयोजित कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खेबुडकर उपस्थित होते. त्यावेळी व्यासपीठावर सरपंच श्रीमती यशस्वी सौदागर, ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांसह अन्य उपस्थित होते. यावेळी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन तसेच आजगाव ग्राम पंचायतच्या वेबसाईट चे उद्घाटन देखील श्री. खेबुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार तथा माजी शिक्षण मंत्री दीप केसरकर यांनी झूम मीटिंग द्वारे आजगाव ग्रामपंचायत टीम आणि ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला आणि अभियान यशस्वी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.