
मालवण : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र लाभार्थी यादीस मंजूर देत शासनाकडे पाठवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 35 हजार 527 लाभार्थी अर्ज यांना मंजूर देण्यात आली आहेत. यात कुडाळ, मालवण तालुक्यातुन 42 हजार 989 पात्र लाभार्थी अर्ज मंजूर झाले आहेत. अशी माहिती या योजनेचे कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रनिहाय समिती सदस्य सतीश (राजु) परुळेकर यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर क्षेत्रनिहाय समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या अध्यक्ष, सदस्य, सदस्य सचिव यांची बैठक सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी दालन येथे संपन्न झाली. यात आतापर्यंत प्राप्त पात्र लाभार्थी यादीस मंजुरी देण्यात आली आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 35 हजार 527 लाभार्थी अर्ज यांना मंजुरी देण्यात आली. यात मालवण तालुक्यातून 16 हजार 766 तर कुडाळ तालुक्यातून 26 हजार 223 पात्र लाभार्थी अर्ज मंजूर झाले आहेत.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपानेते निलेश राणे यांचे कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रसमितीच्या वतीने समिती सदस्य राजु परुळेकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.