मुख्यमंत्री शिंदेंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा..!

Edited by: विनायक गावस
Published on: February 09, 2024 11:14 AM
views 247  views

सावंतवाडी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने रूग्णांना फळवाटप, होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आल. तर चिमुकल्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

एकनाथ शिंदेंच्या ६० व्या वाढदिवसानिमीत्त शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून होतकरू १५ विद्यार्थ्यांना दत्तक घेत त्यांचा शालेय शिक्षणाचा खर्च उचलण्यात आला. तर येथील उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळेंच्या उपस्थित हा कार्यक्रम करण्यात आला. तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवित लहान मुलांच्या हस्ते केक कापून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिर्घायुष्य लाभो व ते पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होवोत अशा शुभेच्छा यावेळी शिवसैनिकांकडून देण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, शहरप्रमुख बाबु कुडतरकर, महिला शहर प्रमुख भारती मोरे, अनारोजीन लोबो, अँड.निता सावंत, सुरेंद्र बांदेकर, शुभांगी सुकी, शर्वरी धारगळकर, सुधीर धुमे, गजानन नाटेकर, प्रेमानंद देसाई आदी उपस्थित होते