भावई, भवानी चरणी मुख्यमंत्री नतमस्तक !

भवानीच्या आशीर्वादानं मुख्यमंत्री: डॉ. प्रमोद सावंत
Edited by: विनायक गावस
Published on: November 30, 2023 14:29 PM
views 162  views

सावंतवाडी : कुलस्वामिनी भवानी देवीची पुजा करण्याचा जो मान दिलात व राजेसाहेबांच्या हस्ते सत्कार केलात त्याबद्दल मी ऋणी आहे. सभापती म्हणून आलो तेव्हा राजेसाहेबांची भेट झाली होती. सभापती असताना मुख्यपद मिळाव अशी मागणी सर्वांनी केली होती. आज मुख्यमंत्री म्हणून मी कुणकेरीत आलो आहे असं मत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केलं. कुणकेरी येथील देवी भावई व देवी भवानीच त्यांनी आज दर्शन घेतलं. याप्रसंगी ते बोलत होते. ‌


ते म्हणाले, तुमच्या प्रेमाबद्दल मी आभार व्यक्त करतो. याठिकाणी उपस्थित युवराज लखमराजे भोंसले हे देखील चांगल काम करत आहेत. आपण राज्याच्या व देशाच्या विकासासाठी काम करत राहू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हीजनरी नेतृत्वाखाली काम करत विकसित भारतासाठी सर्वजण एकत्र येऊ असं मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केल. सावंत-भोसले कुटुंबियांकडून केलेल्या सत्कार उत्तर देताना ते बोलत होते.


राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते सावंत-भोसले कुटुंबियांकडून डॉ. प्रमोद सावंत यांचा सत्कार करण्यात आला. कुणकेरी गावात आल्यानंतर येथील श्री देवी भावई व देवी भवानीचं दर्शन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी घेतल. सुरुवातीला देवी भावईच्या मंदीरात जात त्यांनी दर्शन घेतलं. त्यानंतर येथील गणपती मंदिरात श्री गणेशाला वंदन केले. याप्रसंगी  कुणकेरी स्थानिक सल्लागार उपसमितीने त्यांच स्वागत सत्कार केला. यावेळी बोलताना सीएम प्रमोद सावंत यांनी आभार मानले.  माझ्या स्वागतासाठी तुम्ही आलात त्यासाठी खुप आभार. सभापती असताना मी इथे आलो होतो. आता मुख्यमंत्री झाल्यावर मी आलो आहे. आज योगायोग जुळून आला. तुम्हाला भेटून आनंद झाला. देवीचे आशीर्वाद घेता आले. मोदींच व्हिजन विकसित भारताच आहे. ही संधी चांगली आहे. विकास करून घेण्यासाठी ही संधी आहे‌ राज्य सरकारकडून याचा फायदा करून घेत विकास करावा असं आवाहन त्यांनी भाजपचे माजी आमदार राजन तेली व प्रभाकर सावंत यांना केलं. तर सगळ्या सावंतांना भेटून आनंद झाला अशी भावना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली. 


त्यांनतर सीएमनी सावंत भोसले परिवाराच्या मुळघरी जात श्री देवी कुलस्वामिनी भवानीच दर्शन घेतल. देवीला पुजा अभिषेक केला. सावंत-भोसले कुटुंबियांसह, सावंत भोसले कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सावंत भोसले कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून भक्त निवासाला सहकार्य करण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना निवेदन देण्यात आलं. याप्रसंगी राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांनी हा सत्कार केला. याप्रसंगी राजेसाहेब खेमसावंत भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, बीकेसी अध्यक्ष अच्युत सावंतभोसले, राजू राऊळ, बंड्या सावंत, माजी सावंतवाडी  सभापती प्रमोद सावंत, सरपंच सोनिया सावंत, आंबेगाव सरपंच शिवाजी परब, पोलिस पाटील तानाजी सावंत, विश्राम सावंत, अभिजीत सावंत आदी उपस्थित होते.