
सिंधुदुर्ग : राजकोट येथील किल्ल्यावर नव्याने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतराच्या खचलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी पुणे येथील कोकण प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता सोमवारी सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.
दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या घटनेची माहिती दिली होती. त्यामुळे या घटनेचे गंभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी कोकण प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता यांना तात्काळ घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कोकण प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता शरद राजभोज सकाळी ११:०० वाजता मालवण राजकोट किल्ल्याची पाहणी करणार आहेत. ही पाहणी करून घटनेचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत. दरम्यान मात्र जिल्ह्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी या घटनेबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे खुलासा जाहीर केला राजकोट किल्ल्यावरील महाराजांचा पुतळा व त्याचा चबुतरा पूर्णपणे मजबूत सुरक्षित आणि सुस्थितीत असल्याचं त्यांनी म्हटले आहे. त्या पुतळ्याला कोणतीही संरचनात्मक नुकसान झालेले नाही. दुरुस्त करण्यासाठी आवश्यक उपाय करण्यात आले असून हे काम अत्यंत तत्परतेने सार्वजनिक बांधकाम करून करण्यात येत असल्याची माहिती श्री किणी यांनी दिली आहे.
14 व 15 जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हा व मालवण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चबुतराच्या बाजूने भरलेल्या मातीचा भराव किंचित प्रमाणात खचला आहे मात्र त्याचा कोणताही परिणाम चबूतऱ्याच्या मुख्य रचनेवर किंवा पुतळ्यावर झालेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केला आहे.