साटेली भेडशीत छाया धर्णे सरपंच पदासाठी विजयी

संपुर्ण पॅनलवर गवविकासचे वर्चस्व
Edited by: संदीप देसाई
Published on: November 06, 2023 11:57 AM
views 558  views

दोडामार्ग : प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून लढविण्यात आलेल्या साटेली भेडशीत छाया धर्णे सर्वाधिक मते मिळवून विजयी झाल्या आहेत. त्यांनी सर्वाधिक 1002 मते मिळवून या निवडणुकीत विजय मिळविला मिळविला आहे प्रतिस्पर्धी उमेदवार नेहा नरेंद्र ठाकूर यांना 194 अश्विनी विश्वास धरणे यांना 127 व मोरेस्कर दिपाली किरण यांना 435 मतं मिळाले आहेत.

छाया धरणे यांचा विजय जाहीर होतात त्यांच्या समर्थकांनी तहसील कार्यालयासमोर एकच जल्लोष केला. तर त्या सरपंचांच्या स्वागतासाठी तालुक्यातील सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान विजयी उमेदवारांनी मात्र आपण सर्व विजयी उमेदवार गाव विकास पॅनल मधून निवडून आल्याचे सांगितले आहे. दरम्यान भाजपचे एकनाथ नाडकर्णी,रमेश दळवी, ऊबाठाचे बाबूराव धुरी, संदीप धरणे, राष्ट्रवादीचे संदीप गवस,  शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस राजेंद्र निंबाळकर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख संजय गवस भाजपचे तालुकाप्रमुख सुधीर दळवी यांसह पदाधिकाऱ्यांनी विजयी उमेदवारांचे स्वागत केले आहे.