साटेली भेडशीत छाया धर्णे विजयी..!

Edited by: संदीप देसाई
Published on: November 06, 2023 11:40 AM
views 526  views

दोडामार्ग : प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून लढविण्यात आलेल्या साटेली भेडशीत छाया धर्णे सर्वाधिक मते मिळवून विजयी झाल्या आहेत. त्यांनी सर्वाधिक एक हजार दोन मते मिळवून या निवडणुकीत विजय मिळविला मिळविला आहे.  प्रतिस्पर्धी उमेदवार नेहा नरेंद्र ठाकूर यांना 194 अश्विनी विश्वास धरणे यांना 127 व मोरेस्कर दिपाली किरण यांना 435 मतं मिळाले आहेत. छाया धरणे यांचा विजय जाहीर होतात त्यांच्या समर्थकांनी तहसील कार्यालयात एकच जल्लोष केला तर त्या सरपंचांच्या स्वागतासाठी तालुक्यातील सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे.