
मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी घटनेचा निषेध करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मालवण येथील कार्यालयात जाऊन तोडफोड केली. याबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाची तोडफोड केली याबाबत विचारले असता, मंत्री चव्हाण म्हणाले.
घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. त्यांनी कार्यालयाची केलेली तोडफोड ही जनभावना आहे. त्यात काही चूक आहे असं वाटत नाही. ही घटना पाहिल्या नंतर प्रतिक्रिया उमटणारच. कार्यालयाची तोडफोड करणे योग्य नाही. पण जन भावनांच आदर करणे गरजेचे आहे. हे कशामुळे झाले याबाबत नाईक यांची समजूत काढणार असल्याचेही रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.