
मालवण : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या नंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे मालवण येथे दाखल झाले आहेत. घटनास्थळी पाहणी करत नौदलाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत त्यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व अधिकारी याठिकाणी उपस्थित आहेत. पुतळा कशामुळे कोसळला याबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.