
मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार कालिदास कोळंबकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. छत्रपती महाराज महाराज जयंतीचे औचित्य साधून आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी उभारण्यात येणारी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती पालकमंत्री नितेश राणे यांना देऊन सन्मानित करण्यात आले.