इन्सुलीत 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर'

ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती
Edited by: भगवान शेलटे
Published on: April 25, 2025 14:53 PM
views 95  views

बांदा : महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी व विद्यार्थी यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याचा विचार आहे. यादृष्टीने राज्यामध्ये "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान" आयोजन करण्यात येत आहे.

आज दिनांक २५ एप्रिलला 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' इन्सुली शाळा नंबर १ इथं संपन्न झाले. यावेळी नागरिकांना आवश्यक दाखल्यांचं वितरण करण्यात आलं तसचं त्यांच्या प्रश्नांचं निराकरण करण्यात आलं. 

यावेळी क्षेत्रफळ मंडळ अधिकारी व क्षेत्रफळ मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक, तसेच निगुडे, इन्सुली, क्षेत्रफळ गावचे सरपंच, मंडळातील सर्व गावचे पोलीस पाटील, इन्सुली गावचे सामाजिक कार्यकर्ते नारायण राणे आणि सर्व गावचे ग्रामस्थ आदि उपस्थित होते.