छत्रपती शिवाजी महाराज हा अस्मितेचा विषय...!

Edited by:
Published on: June 07, 2023 11:17 AM
views 102  views

सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराज हा केवळ अभिमानाचा, केवळ अभिनिवेषाचा विषय नाही तर तो आपल्या धगधगत्या अस्मितेचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा केवळ डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही तर तो डोक्यात भिनवून घेण्याचा विषय आहे.

छत्रपती रक्तात आहेत ते कृतीत उतरले तर जगण्याचा उत्सव झाल्याशिवाय राहत नाही, स्वराज्याच्या विचारांचा अभिषेक मनाला घालणे हा आजच्या काळातील खरा छत्रपतींचा राज्याभिषेक दिन आहे.सुरुवात छोटी असली तरी चालणं थांबवायचं नाही. एक दिवस नक्कीच आपल्या कर्तुत्वाचा अथांग महासागर झाल्याशिवाय राहत नाही. हा शिव विचारांवरचा विश्वास आहे.    

हाच विश्वास मनात धरून  रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य च्या सिंधुदुर्ग विभाग आणि राजमुद्रा एंटरप्राइजेस, सावंतवाडी यांच्या संयुक्त  विद्यमाने 6 जून 2023 ला "शिवराज्याभिषेक दिन" साजरा करण्यात आला. त्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक व जलाभिषेक करण्यात आला.

यावेळी सावंतवाडी तालुक्यातील प्रतिथयश उद्योजक व नामवंत बांधकाम व्यावसायिक  संजय स. सावंत,  भाग्यलक्ष्मी संजय सावंत,  अजिंक्य स. सावंत,  ऍड. मयुरी अमेय भोसले उर्फ मयुरी स. सावंत, शिक्षिका स्नेहा ज. धोंड, आर्किटेक्ट विकी माने तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेसचे मालक साईनाथ वि. तुळसकर आदी  उपस्थित होते.