कणकवलीत भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 18, 2024 08:22 AM
views 164  views

कणकवली : गेले अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या मतदारसंघासाठी अखेर महायुती, भाजपचे उमेदवार नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे कणकवलीत राणेंच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला. कणकवली येथे शहर भाजपच्या कार्यालयाजवळ तसेच कणकवली

पटवर्धन चौक येथे फटाके लावून भाजपा व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री त्यांच्या सहभावसंख्या भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.