
सावंतवाडी : कारीवडे, कुणकेरी, आंबेगावसह माडखोलसह पंचक्रोशीत महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा झेंडा फडकला. यानंतर कार्यकर्त्यांनी भाजप नेते महेश सारंग यांना उचलून घेत एकच जल्लोष केला.
सावंतवाडीत भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युतीचे शिल्पकार भाजप नेते महेश सारंग यांच्याच मतदारसंघात शिंदे गटानं त्यांच्या विरोधात आव्हान उभ केल होत. याला भाजप नेते महेश सारंग सडेतोड उत्तर दिले आहे. कारिवडेसह कुणकेरीत शिंदे गटाला पाणी पाजत पराभवाची धूळ चारली आहे.
आंबेगावमध्ये युतीचे शिवाजी परब तर कारीवडेत भाजपचा आरती माळकर, कुणकेरीत भाजपचा सोनिया सावंत विजयी झाल्यात. कोलगाव मतदारसंघात महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली भाजपला घवघवीत यश मिळाले असून काटेकी टक्कर असणाऱ्या माडखोलमध्ये भाजपच्या श्रृश्नवी राऊळ सरपंच पदी विराजमान झाल्या आहेत. कारीवडे, कुणकेरी, आंबेगावसह माडखोलसह पंचक्रोशीत महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा झेंडा फडकला. यानंतर कार्यकर्त्यांनी भाजप नेते महेश सारंग यांना उचलून घेत एकच जल्लोष केला.