
कणकवली : कणकवली तालुक्यातील कासार्डे तरळेमध्ये सायंकाळी पडत असलेल्या पावसामुळे गटारांचे योग्य नियोजन न केल्याने रस्त्यावर पाणी साचून वाहतुकीला अडथळा होत आहे. तसेच सकल भागातील घरांमध्ये देखील पाणी गेल्याने केसीसी कंपनीच्या गलथान कामाचा फटका आता कासार्डे तरळे रहिवाशांना बसत आहे.
कासार्डे ,तळेरे, येथे KCC ठेकेदार कंपनीच्या उदासीन व निष्क्रिय कामकाजाचे सायंकाळी पडणाऱ्या पावसामध्ये दिसून येत आहे. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिजच्या दुतर्फा असलेल्या सर्विस रस्त्यालगत पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी जी गटारे बांधण्यात आलेली आहेत, त्या गटारांचे बांधकाम अत्यंत नियोजनशून्य, कमकुवत व दर्जाहीन अशा स्वरूपाचे आहे काम केल्याने अशा समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे याच्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व राजकीय नेते लक्ष देतील काय, असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.