LIVE UPDATES

शिरगाव हायस्कूलच्या इमारत नूतनीकरणाला माजी विद्यार्थ्यांचा हातभार

चव्हाण कुटुंबीयांकडून ५० हजारांची देणगी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 18, 2026 15:31 PM
views 20  views

देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारत नूतनीकरणासाठी माजी विद्यार्थी डॉ. विवेक चव्हाण, त्यांचे बंधू सुनील चव्हाण व भगिनी शुभलक्ष्मी चव्हाण यांनी कुटुंबीयांच्या वतीने ५० हजार रुपयांचा धनादेश शाळेकडे सुपूर्द केला.

शाळेच्या इमारत नूतनीकरणासाठी माजी विद्यार्थ्यांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद संस्थेच्या कार्यावरील विश्वासाची पावती ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी देणगीचा पारदर्शकपणे उपयोग होईल, या विश्वासातून चव्हाण कुटुंबीयांनी शाळेच्या विकासासाठी हे योगदान दिले.

यावेळी संस्थेचे सरचिटणीस रघुनाथ चव्हाण, उपाध्यक्ष संभाजी साटम, गणपत तावडे, शिरगाव शाळा समितीचे चेअरमन विजयकुमार कदम, मानद अधीक्षक संदीप साटम, कार्यकारिणी सदस्य हेमंत देसाई, मिलिंद साटम, पंडित तावडे, अमित साटम, शाळा समिती सदस्य विश्राम लोके तसेच प्रभारी मुख्याध्यापक उदयसिंग रावराणे उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांच्या या योगदानामुळे शाळेच्या इमारत नूतनीकरणाच्या कार्याला बळ मिळत असून, शाळेशी असलेले माजी विद्यार्थ्यांचे ऋणानुबंध आणि कृतज्ञतेची भावना पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.