
वैभववाडी : श्री रामेश्वर दारुबाई स्पोर्ट्स क्लब कुसूर यांच्यावतीने उद्या दि२१मार्च रोजी रात्रौ ९ वा."छावा" चित्रपट पडद्यावर दाखविण्यात येणार आहे. होळीचा मांड येथे याच आयोजन केले आहे.
देशभरात सध्या गाजत असलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला छावा चित्रपट शुक्रवारी (ता.२१)रात्री कुसूर होळीचा मांड येथे पडद्यावर दाखविण्यात येणार आहे. हा संपूर्ण चित्रपट मोफत असणार आहे. प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री रामेश्वर दारुबाई स्पोर्ट्स क्लब कुसूरच्यावतीने करण्यात आले आहे.