
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत चौकुळ येथील 'चौकुळ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज'ने देदीप्यमान यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, या विद्यालयाने सलग सहाव्या वर्षी १००% निकालाची आपली उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
वाणिज्य विभागात कु. वैभवी गावडे हिने ८४% गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला. प्रशालेतून कु. वैभवी गावडे ८४% प्रथम, द्वितीय कु. रिया गावडे ७७%, तृतीय संतोषी राऊत ७४% हीने प्राप्त केला आहे. तसेच कला विभागामध्येकु. विशाखा गावडे हिने ७०% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. संतोष नाईक ६३% द्वितीय, कु. आर्यन गावडे ५९% तृतीय क्रमांक पटकावला आहे.










