सावंतवाडीत शिवशंभोचा जप !

स्वयंभू श्री देव पाटेकर, माठेवडा इथल्या श्री देव आत्मेश्वर मंदीरात महाशिवरात्रीचा मोठा उत्साह
Edited by: विनायक गांवस
Published on: February 18, 2023 13:43 PM
views 349  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्त उत्साहाच वातावरण पहायला मिळाल. श्री शंकराच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ठिकठिकाणी शिव नामाचा जप सुरु होता‌.सावंतवाडी संस्थानकालीन ऐतिहासिक राजवाड्यात श्री देव पाटेकर मंदीरात शिवरात्रोत्सव साजरा झाला. सावंतवाडीसह आजूबाजूच्या गावातील लोकांनी राजवाड्यात जात स्वयंभू श्री देव पाटेकराच दर्शन घेतले.


माठेवडा येथील श्री देव आत्मेश्वर मंदीरात महा शिवरात्रीचा मोठा उत्साह पहायला मिळाला. सकाळपासून पुजा, अभिषेकासाठी शिवभक्तांनी गर्दी केली होती. महापुरुष देवस्थानात देखील महादेवाच्या लिंगाची पूजा करण्यात आली. सावंतवाडी पोलीस लाईन येथील श्री देव पाटेश्वर मंदीरात सत्यनारायण महापूजा व आरती पार पडली. मोठ्या भक्तिभावानं हा उत्सव साजरा झाला. आरोंदा जोशीवाडी येथे महादेव मंदिरात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवत देवाचं दर्शन घेतले. यंदा मोठ्या भक्तिभावानं व उत्साहात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला.