
सिंधुदुर्गनगरी : समाज कल्याण विभागाच्या विविध योजना तळागाळातील वंचित घटकापर्यंत पोहचविण्याकरिता व कामकाजामध्ये आहे. त्या दृष्टीने कामकाजाचे नियोजन करावे. असे उद्गगार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त प्रमोद जाधव यांनी काढले.
समाज कल्याण कार्यालयामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत समता पर्वामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अरविंद महादेव वळंजू, समाजभूषण पुरस्कार विजेते चंद्रकांत भोजू जाधव,अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे सरचिटणीस विजय चौकेकर,कार्यक्रम स्थळी उपस्थित होते.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त प्रमोद जाधव, यांनी समाजकल्याण अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सांगितली. प्रारंभी मान्यवराच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिप प्रज्वलन केले.तदनंतर सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी सुसंवाद साधण्यात आला. याप्रसंगी अरविंद व सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी यांनी समाज कल्याण विभागाच्या विविध योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याकरिता तालुका स्तरावर अधिकारी पाहिजे असे मत व्यक्त केले. वाय. एन. कदम यांनी बाटी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था मार्फत स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गातील विदयार्थ्यांना मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले .यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. व्हिडिओ कॉन्फरन्सला कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी,सामाजिक कार्यकता व समतादूत उपस्थित होते.
अनुसूचित जाती घटकासाठी कार्य करणारे समाजसेवी कार्यकते, प्रतिनिधी, कर्मचारी वर्ग यांची कार्यशाळा ( विषय : अनुसूचित जाती उत्थान : दशा आणि दिशा) ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करणेत आली होतो. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समाज कल्याण निरीक्षक अनिल किशनराव बोरीकर यांनी केले.