
सावंतवाडी : तालुक्यातील ग्रामपंचायतीत मुलभूत गरजांची पूर्तता करण्यात सत्ताधारी लोक अपयशी ठरल्यान परिवर्तन होणार असून मतदार यावेळी राष्ट्रवादी अर्थात महाविकास आघाडीच्या पाठिशी राहील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केला. तर चराठ्यात विजयाचा विश्वास सरपंच पदाच्या उमेदवार मारीता बावतीस फर्नांडिस यांनी व्यक्त केलाय. यावेळी दर्शना बाबर-देसाई, इफ्तेकार राजगुरू, अँड. सिद्धी परब आदी उपस्थित होते.