कुसूरच्या वाडिया जत्रोत्सवाच्या तारीखेत बदल

या दिवशी होणार जत्रोत्सव
Edited by:
Published on: November 24, 2024 18:46 PM
views 671  views

वैभववाडी : कुसूर गावच्या श्री रामेश्वर दारुबाईचा वाडीया जत्रोत्सव डिसेंबर महिन्यात २९, ३० या तारखेला होणार आहे.काही कारणांमुळे हा महीन्यात होणार हा जत्रोत्सव पुढील महिन्यात होणार आहे.

कुसूरचा वाडिया जत्रोत्सव हा पंचक्रोशीत प्रसिद्ध असा जत्रोत्सव आहे.दरवर्षी कार्तीक महीन्यात शिवरात्री अमावास्येला हा उत्सव होतो.या वर्षी काही अडचणींमुळे या उत्सवाच्या तारीखेत बदल करण्यात आला आहे.हा उत्सव डिसेंबर महिन्यात २९व ३०तारीखला होणार आहे.रविवार दि२९ला श्री रामेश्वर दारुबाई मंदिर रात्री धार्मिक कार्यक्रम व दि.३०रोजी ओटी भरणे हा कार्यक्रम होणार आहे.भाविकांनी या उत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थानकडून करण्यात आले आहे.