
दोडामार्ग : तिलारी घाटाच्या पायथ्याशी सुरु असलेल्या पुलाचे बांधकाम झाल्यावर तिलारी घाटमार्गे कोल्हापूर, बेळगावला जाणारी एसटी बससेवा सुरु करणार असून याला कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी हिरवा कंदील दिला आहे.
दोडामार्ग तिलारी रामघाटात वारवार होणाऱ्या अपघातास कारणीभूत ठरलेले नादुरुस्त संरक्षक कठडे यामुळे गेल्या वर्षभरात या घाटात अनेक अपघात घडले. तसेच हल्ली झालेल्या मुसळधार पावसाने घाटाच्या पायथ्याशी असलेल्या घाटीवडे येथील बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा पर्यायी रस्ताच वाहून गेल्याने येथील वाहतु बंद झाली होती. याच पाश्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधीकारी यांनी तिलारी घाटातील अवजड वाहतूक 31 ओक्टोबर पर्यंत बंद केली होती.
यामुळे दोडामर्ग व गोव्यातील जनतेला व प्रवाशांना याचा आर्थिक फटका बसला होता. याचा सर्व विचारता करता आमदार राजेश पाटील यांनी जिल्हाधिकारी येडगे यांची व जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांची भेट घेऊन चंदगड - दोडामार्ग बस सेवा सुरू ठेवण्यात करीता सूचना केल्या व सबंधीत दोडामार्ग सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली तिलारी घाटाच्या खाली घाटीवडे विजघर गावाजवळ बंद असलेला रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर लवकरच बस सेवा पूर्वरत करण्यात येतील असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले