भात पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 12, 2023 11:54 AM
views 174  views

कणकवली : जूनची १२ तारीख उलटली तरी देखील म्हणावा तसा पाऊस अजून सुरू झाला नसल्याने शेतकरी आता चिंतेत पडला आहे. कारण भात पेरणी तर केली पण त्याला लागणारा पाऊसच आला नाही तर भात उगवणार कसे. पेरणी पासून भात पिके पर्यंतचा कालावधी हा महान बियाचा 100 ते 140 दिवसाचा असतो व हळव्या बियाण्यांचा कालावधी 90 ते 120 दिवसांचा असतो पण पाऊसच लांबणीवर असल्याने हे बियाणे पेरून ते पिणार कधी जर पाऊस मधील काळात पडलाच नाही तर शेतकऱ्याचे मोठे नुकसान होणार असल्याने शेतकरी याचा चिंतेत पडला आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात पडणारा पाऊस अजून पडत नसल्याने सर्वांनाच चिंता लागून राहिल्याचे दिसत आहे.