
सावंतवाडी : सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. आंब्याच्या व जांभळाच्या झाडाखालील रस्ते आंबे, जांभळे पडून पूर्णपणे बुळबुळीत झाल्याकारणाने त्यावर वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील दोन दिवसापूर्वी अवकाळी पावसात रस्त्यावर वाहने स्लीप होऊन चार अपघात घडले. त्यामध्ये वाहन चालक गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावे असे आवाहन सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी केले आहे.
आता मोठा पाऊस सुरू होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपल्या जीवाची योग्य अशी काळजी घेऊन आपली वाहने सावकाश चालवावीत. सावंतवाडी शहरांतर्गत पावसामध्ये रस्त्यावर झाडे पडली असतील पावसामध्ये कोणी कुठेतरी अडकून पडला असेल तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये काही मदतीची आवश्यकता असल्यास सावंतवाडी नगरपरिषद, पोलीस स्टेशन किंवा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानशी 9405264027/ 9423304674 या नंबर वर संपर्क साधावा या माध्यमातून तात्काळ मदत केली जाईल. मोठ्या वादळी पावसामध्ये शक्यतो बाहेर पडू नये असे आवाहन रवी जाधव यांनी नागरिकांना केले आहे.