
वेंगुर्ला : तालुक्यातील तुळस येथे सावंतवाडी वेंगुर्ला मुख्य मार्गावर जैतीर मंदिर नजीक मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांच्या बसला अपघात होऊन यात काही प्रवासी जखमी झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. येथून जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी हा अपघात बघून चाकरमान्यांच्या मदतीसाठी धाव घेत त्यांना धीर दिला. अपघातग्रस्त बस मधील सर्व प्रवाशांना स्थानिक ग्रामस्थांनी बस मधून सुखरूप बाहेर काढले आहे.
तर जखमींना वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला. दरम्यान, येथून जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी अपघातग्रस्त चाकरमान्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. जखमींची विचारपूस करत मदतकार्यात सहभाग घेतला. अपघाताने घाबरलेल्या महिलांना त्यांनी धीर दिला. उपस्थित ग्रामस्थांसह मदतकार्यात सहभाग घेतला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी प्रशासनाला साईड पट्टी खचल्याचे पत्राद्वारे कळवून देखील काम न केल्याने हा प्रसंग उद्भवला अशी तीव्र नाराजी अर्चना घारे यांच्याकडे व्यक्त केली. प्रशासनाच्या कारभाचा तीव्र शब्दांत ग्रामस्थांनी निषेध केला.