जि.प.च्या विषय समिती सभापतीपदासाठी 'यांच्या' नावांची वर्णी

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: March 25, 2026 14:19 PM
views 296  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदांची निवड आज होत असून, भाजपा कडून पोंभुर्ले जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नारकर, रेडी जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ तर शिंदे सेनेकडून पेंडूर जिल्हा परिषद सदस्य संतोष साटविलकर, जानवली जिल्हा परिषद सदस्या रुहिता तांबे यांची वर्णी लागली आहे.


दरम्यान समाज कल्याण सभापती पदी शिंदे सेनेच्या रुहिता तांबे, महिला बाल विकास सभापती पदी भाजपाच्या अनुराधा नारकर यांची निवड निश्चित झाली आहे. तर वित्त, बांधकाम सभापती पदी संतोष साटवीलकर , तर शिक्षण व आरोग्य सभापतती पदी प्रितेश राऊळ याची नावे निश्चित झाली आहेत.