छ. शिवाजी महाराजांचा पुतळा भावी पिढीला अखंड प्रेरणा देत राहणार

अर्चना घारे-परब यांचं प्रतिपादन
Edited by: विनायक गावस
Published on: June 06, 2023 19:16 PM
views 73  views

सावंतवाडी : शिवराज्याभिषेक दिनाच्या पावन दिनाचे औचित्य साधून विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालय येथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण संपन्न झाले. शाळेच्या प्रांगणात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या भावी पिढीला अखंड प्रेरणा देत राहणार असा विश्वास यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केला. 


यावेळी माजी उपसभापती. विनायक दळवी, माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे,  विलवडे ग्रामपंचायत सरपंच  प्रकाश दळवी, ओटवणे ग्रामपंचायत सरपंच दाजी गावकर,. परेश धर्णे, संजय गावडे इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.