‘विकसित भारत संकल्प यात्रे'तून शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा !

देशव्यापी मोहिमेचा लाभ घ्या : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा
Edited by: भगवान शेलटे
Published on: December 16, 2023 18:20 PM
views 21  views

सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे या योजनांचे लाभ घ्या, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी केले. निरवडे गावासह पंचक्रोशीत मैदानी खेळासाठी क्रीडांगण नसल्याने येथील युवक युवती त्यापासून वंचित आहेत. त्यामुळे मैदानी खेळासाठी क्रीडांगणाला निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासनही त्यांनी दिले. महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ आज निरवडे गावात दाखल झाली होती. त्या यात्रेचे उद्घाटन मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना मिश्रा पुढे म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावोगावी जावून विकासाच्या विविध शासकीय योजनांचा जागर करणार आहे. कृषी, आरोग्य, महसूल यांसह इतर विभागांच्या माध्यमातून शेतकरी, महिला, युवा यांच्यासाठी असणाऱ्या योजना गावागावात पोहचविण्यासाठी विकास यात्रारथ गावोगावी फिरणार आहे. या विकास रथाच्या माध्यमातून गावागावांतील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळणार असून वेगवेगळ्या योजनांच्या लाभासाठीचे अर्जही भरून घेतले जाणार आहेत. लाभार्थ्यांच्या केवायसी संदर्भातील तसेच योजनांच्या बाबतीतील अडचणी व शंका यांचे निरसनही जागेवर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व यंत्रणांनी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
        
यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक संचालक मनीष दळवी, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीपाद पाटील, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, विस्तार अधिकारी प्रशांत चव्हाण, निरवडे सरपंचा सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, पंकज पेडणेकर, प्रमोद गावडे, प्रियांका गावडे, अंगारिका गावडे, सदा गावडे, नारायण राणे, धर्माजी गावडे, संतोष गावडे, ग्रामविकास अधिकारी सुनिता कदम, आदेश जाधव, मधुसूदन गावडे, चंद्रकांत गावडे, नागेश गावडे, श्याम बर्डे, विनय गावडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.