सेंट्रल इंग्लिश स्कूलचे जिल्हास्तरीय टेबलटेनिस स्पर्धेत विजेतेपद

विद्यार्थ्यांची विभागस्तरीय निवड
Edited by: विनायक गांवस
Published on: August 23, 2025 16:54 PM
views 36  views

सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा २१-०८- २०२५ रोजी  जय गणेश हायस्कूल , मालवण येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय टेबलटेनिस  स्पर्धेत सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या १७ वर्षाखालील विद्यार्थी गटात कु . इब्राहिम शहा , कु. फुदैल आगा, कु. झैद मेमन , कु . सफवान बांगी या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट क्रीडा कौशल्य दाखवत विजेतेपद पटकावून विभागस्तरावर धडक मारली. 

तसेच  १४ वर्षाखालील विद्यार्थीगटात कु. फरहान खान , कु . इनाया शेख व १७ वर्षाखालील  विद्यार्थी गटात   कु . स्वरा गावडे  या विद्यार्थ्यांची  पुढील विभागीय टेबलटेनिस स्पर्धेसाठी वैयक्तिक निवड करण्यात आली. तसेच १४ वर्षाखालील मुलांच्या गटात कु . फरहान खान , कु . शयान बेग , कु . अब्दुलअमिन निकारी , कु . शैजान नेसर्गी, कु . उमर शहा यांचा संघ तसेच १४ वर्षाखालील मुलींच्या गटात कु . इनाया शेख , कु .वैष्णवी पालकर , कु . अवनी जाधव यांचा संघ आणि १७ वर्षाखालील मुलींच्या गटात  कु .सारा बेग, कु .सिमराह बेग, कु . सोहा शेख ,  कु . सुवर्णा शेख , कु . स्वरा गावडे यांचा  संघ अंतिम सामन्यात उपविजेता ठरला. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या  क्रीडा शिक्षिका श्रीम. मारिया आल्मेडा आणि  शिक्षक 

श्री . सिद्धेश साळसकर यांनी मार्गदर्शन केले . या खेळाडू विद्यार्थ्यांनी क्रीडाक्षेत्रातील शाळेच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे  पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ, पर्यवेक्षिका श्रीम. मारिया पिंटो ,  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक - शिक्षक कार्यकारिणी समिती पदाधिकारी यांनी विजेत्या संघाचे व सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील विभागीय टेबलटेनिस स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.