
कणकवली : कणकवली नगरपंचायत नगरसेवक संजय कामतेकर यांच्या मागणीनुसार कणकवली- परबवाडी येथे स्मशानभूमीचे काम नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून काम मंजूर झाले व या कामास सुरुवात झाली व स्मशानभूमीचे काम शेवटच्या टप्प्यात राहिले आहे. लवकरात लवकर ही स्मशानभूमी चालू करण्यात येईल. असे नगरसेवक संजय कामतेकर यांनी सांगितले.
तसेच तेथील स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांचे सर्वांनी मनापासून आभार मानले. कणकवली शहर विकासाचे खरे शिल्पकार नगराध्यक्ष समीर नलावडे हेच आहेत असेही सांगितले