दोडामार्ग : सावंतवाडी विधानसभा महायुतीचे उमेदवार दीपक केसकर यांनी चौथ्यांदा विजय मिळवत करिष्मा केला याच अनुषंगाने आज दोडामार्ग चौकात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे दीपक केसकर, निलेश राणे, व नितेश राणे यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला सावंतवाडी विधानसभा मतदार संघात दीपक केसकर यांनी चौथ्यांदा विजय मिळवत करिष्मा करून दाखवला त्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीने गुलाल उधळला रविवारी दोडामार्ग येथील भाजप, शुवसेना, आरपीआय, अजित पवार राष्ट्रवादी यां सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दोडामार्ग चौकात एकत्र येऊन महायुतीचा विजय असो, दीपक भाई आगे बढो हम तुम्हारे साथ हो, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणाबाजी करत एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस, भाजप तालुकाप्रमुख सुधीर दळवी, नगराध्यक्षचेतन चव्हाण, माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, प्रकाश गवस, राजू निंबाळकर, युवा सेना तालुकाप्रमुख भगवान गवस, दादा देसाई, तीलकांचन गवस, प्रवीण गवस, बळीराम शेटये, विठोबा पालयेकर, युवा मोर्चा तालुका प्रमुख परशर सावंत, देवेंद्र शेटकर, दीपक गवस, हर्षद सावंत, सत्यवान गवस, गोपाळ गवस, अमर राणे, मायकल लोबो, रत्नदान करपे, तुकाराम बर्डे, समीर देसाई, गोकुळदास बोंद्रे, बबलू पांगम, अनिल शेटकर, महिला तालुकाप्रमुख शिवसेना चेतना गडेकर, सानवी गवस, भाजपच्या संध्या प्रसादी, गुणवंती गावडे, मनीषा गवस, वंदना सावंत, सविता नाईक, विशाखा देसाई आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.