हिंदू हीत हेच ध्येय : मंत्री नितेश राणे

महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन
Edited by:
Published on: February 08, 2025 17:42 PM
views 181  views

 सिंधुदुर्ग : दत्त मंदिर न्यास माणगाव, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त उपक्रमामध्ये मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचा सत्कार आणि मार्गदर्शन आयोजित करण्यात आला होता. 

यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी हिंदू समाजाचे हित पाळण्यासाठी मी इथे बसलो आहे आणि आपले हिंदूत्ववादी सरकार आहे आणि हिंदू हीत हेच आपले ध्येय आहे असा विश्वास या परिषदेमध्ये उपस्थित मंदिर विश्वस्त आणि प्रतिनिधींना दिला. सोबतच भूक, गरजा आणि कुटुंब यापेक्षाही आपणाला धर्म महत्त्वाचा आहे याबद्दलची जागृती उपस्थितांच्या मनात जागवली.

दत्त मंदिर न्यासाच्या बाजूला कृषी विभागाचे जमीन पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्याचे नुसते आश्वासन नाही तर पार्किंग सुरू करा अशी सूचना त्यांनी केली. 

याप्रसंगी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,  मंदिर महासंघाचे अनुप जैस्वाल, दत्त मंदिर माणगाव अध्यक्ष सुभाष भिसे, सचिव दीपक साधले, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आणि सरचिटणीस रणजीत देसाई उपस्थित होते. सूत्रसंचालन आनंद मोंडकर यांनी केले