
सावंतवाडी : संस्थानच्या राजवाडा येथे दसरा आणि विजयादशमी सणाच्या दिवशी सीमोल्लंघन सोनं लुटून करण्यात आले. राजेसाहेब श्रीमंत खेम सावंत भोसले यांनी विधिवत पूजा केली.यावेळी युवराज लखमराजे भोसले उपस्थित होते.
राजपुरोहित शरद सोमण यांनी पूजा सांगितली. सावंतवाडी राजघराणे संस्थान काळापासून दसरा आणि विजयादशमी सणाच्या दिवशी सीमोल्लंघन सोनं लुटून सण साजरा करत आहे. आपट्यांची पाने असलेले झाड रोपण केले जाते. त्याची पूजा केली तर श्री. नाईक यांनी प्रतिकात्मक रूपाला बळी दिला. त्यानंतर राजे श्रीमंत खेमसावंत भोसले यांनी पूजा केली आणि लग्न मंगलाष्टके म्हंटली गेली. यानंतर सोनं लुटून सण साजरा करण्यात आला. यावेळी राजघराण्यावर प्रेम करणारे असंख्य नागरिक उपस्थित होते.