एसएसपीएम काँलेज आँफ इंजिनिअरींगमध्ये व्यसनमुक्ती दिन साजरा

राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे आयोजन
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 15, 2022 19:16 PM
views 179  views

कणकवली : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने व्यसनमुक्ती दिन साजरा करण्यात आला. स्वयंसेवकांकरता ओरीऐंटेशन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या व वक्त्या म्हणून महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती संघटनेच्या सिंधुदुर्ग  जिल्हा समन्वयक सौ. मुंबरकर उपस्थित होत्या.

याप्रसंगी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना सौ. मुबरकर यांनी व्यसनांचे दुष्परिणाम, व्यसनमुक्तीची आवश्यकता व व्यसनमुक्तीकडे कशा सोप्या पद्धतीने जाता येते, याबाबत मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी कु सानिका सरदेसाई व कु मदन पाटील यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले,

कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. अनिश गांगल, प्रशासकीय अधिकारी शांतेश रावराणे, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. एस टी माने, प्रा. अरविंद कुडतरकर, काँम्पुटर विभाग प्रमुख प्रा. सुप्रिया नलावडे, महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.