वॉटर योगातून अनोखा योगदिन साजरा

Edited by: दिपेश परब
Published on: June 21, 2024 09:56 AM
views 317  views

वेंगुर्ला : येथील जलतरण पटूंनी पाण्यात राहून ‘वॉटर योगा‘ करीत  अनोख्या पद्धतीने योग दिन साजरा केला. कॅम्प येथील नगरपरिषदेच्या जलतरण तलाव येथे रोज सकाळी बरीच लहान मुले, युवक, प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिक पोहण्यासाठी येतात. आज यगदिनानिमित्त पाण्यात राहून वॉटर योगा करीत अनोखा योगदिन साजरा केला. त्यानंतर जलतरणाचा आनंदही लुटला.