
सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभागाच्या महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे-परब यांचा वाढदिवस गुरुवार १ डिसेंबर रोजी मडुरे, सावंतवाडी येथील ऑल इंडिया मूव्हमेंट फॉर सेवा चेन्नयीचे दयासागर छात्रालय रोणापाल येथे येथील विद्यार्थी आणि शिक्षकासोबत अतिषय उत्साहात साजरा झाला.
अर्चना फाऊंडेशनच्या माध्यमातून या छात्रालयाला आवश्यक धान्य वाटप देखील या निमित्ताने करण्यात आले. २००७ साली सुरू झालेल्या आज या छात्रालय मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब आणि गरजू असे एकूण ३० मुले-मुली शिक्षण घेत आहेत,ज्यामध्ये १३ मुले आणि ७ मुली येथे निवासी राहून शिक्षण घेत आहेत. आजपर्यंत एकूण ३०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी या छात्रालयातून शिक्षण घेतले आहे आणि यातील विद्यार्थी रेल्वे पोलिस, गोव्यातील नामवंत कंपनी तसेच डॉक्टर, इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.
भविष्यात देखील या छात्रालयाला आवश्यक ती मदत केली जाईल असे अर्चना घारे यांनी आश्वासन दिले.यावेळी ताईनी छात्रालयाचे वार्डन रत्नप्रभा केळुसकर,केअरटेकर वैदही परब आणि व्यवस्थापाक .त्रिवबा विर यांचे विशेष आभार देखील मानले.
यावेळी अर्चना घारेंसोबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,महिला उद्योग व्यापार सेल जिल्हाध्यक्ष सौ.दर्शना बाबर देसाई, शहराध्यक्ष देवा टेमकर, हिदायतुल्ला खान, मंगल कामत आदी उपस्थित होते.