
दोडामार्ग : तळेखोल ते विर्डी मुख्य रस्त्यावर लाखो रुपये खर्च करनू बांधण्यात येणारा कॉजवे काम येत्या आठ दिवसात पूर्ण नकेल्यास 'त्या' कॉजवेवरच उपोषणास बसणार असल्याचा इशारा येथील उपसरपंच महादेव नाईक यांनी दिला आहे. तळेखोल ते विर्डी गावाना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर 67 लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणारा पूल ( कॉजवे ) हा ठेकेदाराच्या मनमानी कारभारमुळे काम अर्धवट राहिला आहे. येथील शेतकऱ्यांच्या मालकी जागेत या ठेकेदाराने पुला साठी लागणारा कच्चा माल टाकून मालकी जमिनीची मोठ्या प्रमानात नासधुस केली असल्याने येथील शेतकऱ्यांनी त्या ठेकेदाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
बांधकाम विभागाचाही दुर्लक्ष
संबंधित काका संदर्भात मी उपसरपंच या नात्याने दोडामार्ग बांधकाम विभाग कार्याकरी अभियंता यांना प्रत्येक्ष भेटून सदर कामाची स्थिती सांगितली त्यावेळी अभियंता घंटे यांनी आपण त्यात लक्ष घालून काम तात्काळ करण्यास सूचना देतो असे सांगितले मात्र पावसाळा सुरवात झालाय तरी बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी या कामाकडे दुर्लक्ष केला असल्याने आपण आता उपोषणास बसणार असल्याचे ते म्हणाले.