
सावंतवाडी : माजगाव - नाईक वाडा येथील धनश्री गावकर यांच्या घरात घुसलेल्या सापाला सर्पमित्र राजन निब्रे यांनी जीवदान दिले. गावकर यांच्या घरातील खोलीत हा सर्प घुसला होता. याची हकीगत सर्प मित्र राजन नीब्रे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तो साप खोलीच्या माळ्यावर लपल्याने त्याला पकडण्यास निब्रे यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अथक प्रयत्नांअंती तो सर्प पकडण्यात यश आले. त्यानंर निब्रे यांनी त्या सर्पाला नैसर्गिक अधिवासात सोडले.