कॅथॉलिक पतसंस्थेचा २८ वा वर्धापन दिन | 280 कोटी व्यवसायाची उत्तुंग भरारी

"कॅथॉलिक वर्धापनदिन विशेष ठेव योजना", कॅथॉलिक उत्सव ठेव योजनेची अध्यक्ष पी. एफ. डॉन्टस यांची घोषणा
Edited by: विनायक गांवस
Published on: October 06, 2022 13:38 PM
views 439  views

सावंतवाडी : कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेचा २८ वा वर्धापन दिन गुरुवार ०६ ऑक्टोबर २०२२ रोजी संस्थेच्या प्रधान कार्यालयात प्रमुख पाहुणे  फादर विल्यम सालदाना तसेच सर्व संचालक मंडळ, माजी संचालक, कर्मचारी व ग्राहकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी.एफ. डॉन्टस यांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी "कॅथॉलिक वर्धापनदिन विशेष ठेव योजना", कॅथॉलिक उत्सव ठेव योजनेची घोषणा अध्यक्ष पी. एफ. डॉन्टस यांनी केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला फादर विल्यम सालदाना यांनी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी.एफ. डॉन्टस यांच्या हस्ते केक कापत वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

या संस्थेच्या ठेवींनी १६५ कोटींचा टप्पा गाठला असून एकूण व्यवसाय २८० कोटी रूपये झाला आहे. संस्थेच्या सर्व शाखा प्रशस्त अशा स्वमालकीच्या जागेत आहेत. तसेच संस्थेमध्ये सि.बि.एस प्रणाली असून राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणेच क्युआर कोड सह सर्व अत्याधुनिक नेट बँकिंगच्या सोयी सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर लवकरच UPI पे टू कॉन्टॅक्ट सुविधा देखील सुरू करत आहे. संस्थेने स्थापनेपासून आपली ऑडीट वर्ग "अ" ची परंपरा कायम राखली आहे. आज संस्था २०० कोटी ठेवीकडे वाटचाल करत असून संस्थेला सहकार क्षेत्रात उत्तम कामगिरीबद्दल विविध स्तरावर वेगवेगळे अॅवॉर्ड देखील मिळाले आहेत.

संस्थेला सतत प्रगतीपथावर ठेवण्यास संस्थेचे सर्व निष्ठवान सभासद, ग्राहक, हितचिंतक, संस्थेशी संबंधित बँका, प्रसार माध्यम, फेडरेशन, सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक या सगळ्यांच्या योगदानाबद्दल अध्यक्ष. पी. एफ. डॉन्टस यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

संस्थेच्या २८ साव्या वर्धापन दिना निम्मित "कॅथॉलिक वर्धापनदिन विशेष ठेव योजना" मुदत: २८ महिने व्याजदर 10% तसेच येणा-या दिवाळी सणा निम्मित नवीन "कॅथॉलिक उत्सव ठेव योजना" मुदत १८ महिने व्याजदर 9.50% मर्यादीत कालावधीसाठी १५.नोव्हें.२०२२ पर्यंत सुरू करत असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष डॉन्टस यांनी केले आहे