
सावंतवाडी : कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेला ३१ मार्च २०२५ अखेर ३ कोटी ३ लाख निव्वळ नफा झाला असून संस्थेने २५० कोटी ठेविचा टप्पा पार केला आहे. कॅथॉलिक पतसंस्थेने केवळ ३२ वर्षाच्या कार्यकाळात सर्व जनमानसात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे.
आर्थिक स्थितीचा विचार करता संस्थेवरील सभासद ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ झाल्यामुळे आज मोठ्या स्वरूपाच्या ठेवी संस्थेकडे जमा होत आहेत. ३१ मार्च २०२५ अखेर संस्थेच्या २५२ कोटी १५ लाख ठेषि, १८८ कोटी ३३ लाख कर्ज संस्थेची बँकेतील एकुण गुंतवणूक ८५ कोटी तर निव्वळ नफा ३ कोटी ३ लाख रूपये झाला असून संस्थेने ४४० कोटी एकजीत व्यवसायाचा टप्पा पुर्ण केला आहे. संस्थेच्या जिल्हयात सहा शाखा असून सर्व शाखा स्वमालकीच्या जागेत आहेत व सर्व शाखा नफ्यात आहेत. शासनाने ठरवुन दिलेल्या आर्दश प्रमाणांचा त्यांच्या अंमलबजावणीसाठी नियोजनबध्द प्रत्यन केल्यामुळे सर्वच आदर्श प्रमाणांच्याबाबतीत संस्थेने यशस्वीपणे काम केले आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात वेगवेगळ्या स्तारावर संस्थेला तीन पुरस्कार मिळाले आहेत. आज संस्थेने राष्ट्रीयकृत बँकाप्रमाणेच आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या नेट बँकिगच्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत व सहकार क्षेजात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
संस्थेने सभासद ग्राहकांच्या प्रत्येक गरजा पुर्ण होण्याकरिता आता पर्यंत कामाची कटिबध्दता बाळगली आहे. संस्थेला सतत प्रगतीपथावर ठेवण्यास संस्थेचे सर्व निष्ठवान सभासद, ग्राहकांचे, तसेच सर्व कर्मचारी, पिग्मी व आर्जत ठेव प्रतिनिधींचे अध्यक्षा श्रीम आनमारी जॉन डिसोजा सर्व संचालक मंडळाने मनःपूर्वक आभार मानले आहे.