कॅथॉलिक पतसंस्थेचा २०० कोटी ठेवीचा टप्पा पार

आता उदिदष्ट ५०० कोटी : पी. एफ. डॉन्टस
Edited by: विनायक गावस
Published on: September 11, 2023 20:25 PM
views 81  views

सावंतवाडी : कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेने २०० कोटी ठेवीचा टप्पा पार केला असून पुढील पाच वर्षात ५०० कोटी ठेवि करण्याचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष पि.एफ. डॉन्टस यांनी सांगितले. जिल्हयात प्रधान कार्यालयासह संस्थेच्या स्वमालकीच्या सहा शाखा असून शाखा सावंतवाडी ने १०० कोटी ठेविचा टप्पा पार केला आहे. 

     संस्था सातत्याने सभासद, ग्राहक हीत जोपासत विकास कार्यामध्ये अग्रेसर आहे. कॅथॉलिक पतसंस्था ही सर्वांची जिव्हाळयाची संस्था तसेच जिल्हयातील अग्रणी पतसंस्था म्हणून नावलौकिक मिळवला आहे. समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना आर्थिक पाठबळ देवून सक्षमपणे स्वावलंबी बनण्यासाठी सहाय्यभूत होणारी पतसंस्था ठरली आहे. संस्थेने सभासद ग्राहकांच्या प्रत्येक गरजा पुर्ण होण्याकरिता आतापर्यंत कामाची कटिबध्दता बाळगली आहे. 

     संस्थेचे कामकाज पाहता कामाची शिस्तबध्द वक्तशीर, पारदर्शक आर्थिक व्यवहार करत सभासदांशी जिव्हाळयाचे नाते ठेवून कामकाज केले जाते. याच कामामुळे संस्थेस सुरवातीपासून सातत्याने ऑडीट वर्ग "अ" मिळाला आहे. १९९४ साली केवळ ३५००० रुपये भागभांडवलावर सुरू केलेली संस्थेने आज २०० कोटी ठेवीचे शिखर गाठले आहे. राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणेच सर्व डिजिटल बँकिंग सेवा पतसंस्थेने आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देत सहकार क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे, त्यामुळे मोठा ग्राहक वर्ग संस्थेकडे आकृष्ट झाला आहे. 

    संस्थेने सुरवातीपासून आपली सामाजीक बांधिलकी जपली आहे. समाजातील गरजू लोकांना त्यांच्या अडचणीच्या वेळी आर्थिक मदतीचा हात देण्यात संस्था नेहमीच अग्रेसर असते व यापुढे देखील राहिल. आमचा वाढता ग्राहकवर्ग संस्थेच्या प्रगतीत व विकासात जे योगदान देत आहे त्याबद्दल आपण त्यांचा ऋणी आहे. सहकार खाते संस्थेशी संबंधीत बँका, राज्य फेडरेशन, जिल्हा फेडरेशन, प्रचार-प्रसार माध्यम या सगळ्यांच्या योगदानाबद्दल मी सर्व संचालक मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो, असे संस्थेचे अध्यक्ष पि.एफ डॉन्टस यांनी सांगितले.