केटरिंग व्यवसायिक प्रदीप सुकी यांचे निधन

सायंकाळी ५ वाजता होणार अंत्यसंस्कार
Edited by: रुपेश पाटील
Published on: December 21, 2022 16:06 PM
views 604  views

सावंतवाडी : शहरातील वैश्यवाडा येथील रहिवासी व प्रदीप केटरर्सचे मालक प्रदीप श्रीपाद सुकी यांचे बुधवारी सकाळी १० वाजता निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. कॅटरिंगसाठी भांडी भाड्याने देणे, तसेच कोकम, अननस सरबत यांची घाऊक विक्रीचा ते व्यवसाय करत.

 माजी उपनगराध्यक्ष महेश सुकी, प्रकाश सुकी, दिवाकर सुकी, मिलिंद सुकी यांचे ते भाऊ तर सावंतवाडी वैश्य समाज महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. विद्या सुकी, माजी नगरसेविका सौ. शुभांगी सुकी यांचे ते दीर होत. धीरज व गजानन सुकी यांचे ते काका होत. त्यांच्या पश्चात पत्नी दीपा, मुलगा अक्षय तसेच भाऊ, वहिण्या, पुतण्या असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर सायंकाळी ५ वाजता अंत्यविधी होणार आहेत.