शंकरा आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोतीबिंदु मुक्त सिंधुदुर्ग अभियान

संस्थेचे अध्यक्ष शरद सावंत, शंकरा आय हॉस्पिटलचे डॉ. राजेश कापसे, नारायण पालव यांची माहिती
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 06, 2023 19:59 PM
views 258  views

कणकवली : आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने व  कमिटेड ॲक्शन फॉर रिलीफ अॅण्ड एज्युकेशन (CARE) अॅण्ड सर्व्हिस सिविल इंटरनॅशनल (SCI) सिंधुदुर्ग महाराष्ट्र ग्रुप यांच्या वतीने मोतीबिंदु मुक्त सिंधुदुर्ग अभियान राबविण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व एक महिन्याचा औषध पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शरद सावंत, शंकरा आय हॉस्पिटलचे डॉ.राजेश कापसे,नारायण पालव यांनी दिली. कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांसाठी मोफत मोतीबिंदू सिंधुदुर्ग अभियान राबविण्यात येणार आहे.आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल मध्ये कार्यरत आहे.आतापर्यंत १० हजार पेक्षा जास्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया या हॉस्पिटल मध्ये केले आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब लोकांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केले जाणार आहे. त्यापूर्वी कणकवलीत शस्त्रक्रिया पूर्व तपासणी लोकांची केली जाईल. त्यातून मोतीबंदू शस्त्रक्रिया अत्यावश्यक असलेल्या ५० रुग्णांची निवड  झाल्यानंतर त्यांना पनवेल येथे नेण्यात येणार आहे. त्या रुग्णांची राहण्याची, खाण्याची व ने- आण करण्याची व्यवस्था आमच्या संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे.डोळ्याची लेन्स व टाक्याची शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

कोकणातील प्रत्येक जिल्ह्यातील अंधत्वाचे निवारण व्हावे,यासाठी आम्ही प्रयत्न करीत असतो, हॉस्पिटल मार्फत ही जनजागृती केली जाईल.महिन्यातून एक कॅम्प घेतला जाईल.रुग्णांची तपासणी करुन निवड केली जाईल,असे डॉ.राजेश कापसे यांनी सांगितले.

कमिटेड ॲक्शन फॉर रिलीफ अॅण्ड एज्युकेशन (CARE) अॅण्ड सर्व्हिस सिविल इंटरनॅशनल (SCI) सिंधुदुर्ग या संस्थेच्या माध्यमातून समाजसेवक कसे घडवावेत ?  यावर काम केले जाते .आतापर्यंत ५ हजार लोकांना आता प्रशिक्षित केले आहे. त्यातील राज्यात लोक राजकारण आणि समाजकारण करीत आहेत.आमचा कोर्स केल्यानंतर अनेक लोक कपण्यांमध्ये केले जातात.कुडाळ येथील सविता आश्रम मध्ये हा कोर्स सुरु आहे.तसेच व्हिजन सेंटर चालू करणार आहोत.आय हॉस्पिटल मध्ये सहाय्यक आवश्यक असतात,त्या साठी डिप्लोमा कोर्स चे आम्ही प्रशिक्षण देतो.त्या विद्यार्थ्यांना फेलोशिप आमचे हॉस्पिटल कडून दिली जाते.त्यानंतर शंकरा आय हॉस्पिटल मार्फत त्यांना चांगला पगार दिला जातो, असे डॉ.राजेश कापसे सांगितले.