दोडामार्ग : दोडामार्ग शहरात काल बुधवारी सायंकाळी झालेल्या तीन वाहनांच्या अपघात प्रकरणी महिंद्रा टेम्पो चालकावर दोडामार्ग पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. हा चालक 18 वर्षाचा असून तो मूळ मध्य प्रदेशचा आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दोडामार्ग तहसीलदार कार्यालयात नजीक असलेल्या चेकपोस्ट जवळ बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला. सुमित बिल्लू कोल.(वय 18 ) ( रा.परसेल ता. बडवरा.जि.करणी.राज्य मध्य प्रदेश. सध्या राहणार सुरुचीवाडी दोडामार्ग) याने महिंद्रा टेम्पो क्रमांक ( G A 01F 6753) या आपल्या गाडीद्वारे राजाराम बेबो कांबळे रा. मणेरी.ता. दोडामार्ग जि.सिंधुदुर्ग यांना त्यांच्या ऍक्टिवा दुचाकी ( MH 07 AK 4639) व महेश इब्रामपूरकर रा.इब्रामपूर ता. पेडणे -गोवा यांच्या एक्सिक्स दुचाकी (MH07 AM 2390) या दोघांनाही जोरदार धडक दिली. त्यामध्ये वरील दोघांनाही गंभीर दुखापत झाली तसेच वाहनांचे नुकसानही झाले. या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी सुमित कोल याच्यावर येथील पोलिसांनी मोटर वाहन अधिनियम 1918 कलम 3,181,184,185, गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात बाबूसो बेबो कांबळे राहणार मणेरी गौतमवाडी ता.दोडामार्ग यांनी फिर्याद दिली.