आंगणेवाडी यात्रेसाठी प्रशासनाकडून चोख नियोजन

Edited by:
Published on: February 21, 2025 13:58 PM
views 252  views

सिंधुदुर्गनगरी : प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीची यात्रा सुरक्षित पार पडावी यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने जोरदार नियोजन केले आहे. २२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या जत्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यात्रा शांततेत पार पडावी यासाठी ६ पोलीस उपअधीक्षक यांच्यासह ५१ अधिकारी, ६५० पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड तसेच दोन दंगल नियंत्रक पथक, घातपात विरोधी पथक नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय ५० सीसीटिव्ही कॅमेरे, दहा व्हिडिओ शूटिंग कॅमेरे आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यात आंगणेवाडी येथील श्री. भराडी देवीचा वार्षिक जत्रौत्सव 22 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी २०२५ या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. या जत्रौत्सवासाती दरवर्षी सुमारे 3 ते 4 लाख भाविक मुंबई व महाराष्ट्र राज्याच्या अन्य भागातुन येत असतात. तसेच राज्यातील विविध खात्याचे मंत्री, इतर राजकीय पक्षाचे नेते, आमदार, खासदार असे महत्याचे व्यक्ती येत असतात.

या अनुषंगाने यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घड्डु नये या करीता सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे वतीने बंदोबस्तकरीता 6 पोलीस उपअधीक्षक, 13 पोलीस निरीक्षक, 32 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, 500 पोलीस अंमलदार, 2 दंगल नियंत्रण पथक, 150 होमगार्ड, तसेच घातपात विरोधी पथक नेमण्यात आलेले आहे. तसेच यात्रेतील भाविकांचे सुरक्षेकरीता यात्रा परिसरात 50 सीसीटिव्ही कैमेरे, 10 व्हिडीओ शूटींग कॅमेरे व ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने संपूर्ण यात्रा परिसराची निगराणी ठेवण्यात येणार आहे, असे पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी सांगितले.

तसेच पोलीस विभागामार्फत साध्या वेशातील विशेष पथके तयार करण्यात आलेली असुन त्यांचे माध्यमातून सराईत गुन्हेगार, पिकॉकेटींग, चैन स्नॅचिंग यांचेवर विशेष लक्ष ठेवून यात्रेत कोणताही अनुचित प्रकार, घटना घडणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. तसेच महत्वाच्या अन्य ठिकाणी देखील पोलीस विभागांमार्फत पायी पेट्रोलींग करुन महिलांची छेडछाड होणार नाही याकरीता विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

भाविकांच्या मदतीकरीता मंदीर परिसराजवळ अद्यावत पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला असून त्याठिकाणी इतर विभागांचे समन्वय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पोलीस विभागातर्फे डायल-112 व सायबर जनजागृतीचे ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात येणार असुन कोणत्याहो आपत्कालीन परस्थितीत डायल-112 चा जास्तीत-जास्त वापर करावा, तसेच सिंधुदुर्ग पोलीस दलाचे वतीने जेष्ठ नागरीकांसाठी तयार करण्यात आलेली हेल्पलाईन क्र. 7036606060 यावर संपर्क साधून आलेल्या अडि-अडचणी करीता वापर करण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

त्याचप्रमाणे यात्रा परिसरात हॉटेल्स, टपऱ्या इत्यादी ठिकाणी अनधीकृत सिलेंडरचा वापर होणार नाही याकरीता पोलीस विभाग, अन्न व औषध प्रशासन विभागाचे वतीने तपासणी करुन कठोर कारवाई करण्यात येणार आहे, वाहतुक पोलीस विभागामार्फत देखील ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह व इत्यादी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणारे इसमांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच विद्युत्त विभागाचे वतीने देखील विज चोरी होऊ नये म्हणून कारवाई करण्यात येणार आहे.

यात्रेमध्ये वाहतुक कोंडी होऊ नये याकरीता 3 ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामध्ये मालवण कडुन येणारी वाहने, मसुरे कडून येणारी वाहने व काणकवली कडून येणाऱ्या वाहनांकरीता वेगवेगळी पार्कीग व्यवस्था करण्यात आलेली आहे, तरी येणाऱ्या भाविकांनी आवश्यकते प्रमाणे पार्किंगचा वापर करावा, पार्किंग व्यतीरीक्त अन्य ठिकाणी वाहने पाकींग केल्यास वाहतूक पोलीसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असाही इशारा देण्यात आला आहे.

यात्रेकरीता येणाऱ्या भाविकांनी श्री. भराडो देवीचा वार्षिक जत्रौत्सव भक्तीमय वातावरणात व सुरक्षीतरित्या पार पडण्याकरीता कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस विभागास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.