
सावंतवाडी: हवाई क्षेत्र, जहाज क्षेत्र, पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील करिअर संधी यावरील करिअर मार्गदर्शन कार्यक्रम सावंतवाडीमध्ये संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण मंडळ अंतर्गत, आय.आय.बी.एम. जेट इंडिया शिक्षण संस्थेतर्फे सावंतवाडी मधील विद्यार्थ्यांसाठी बुद्धिमत्ताकल चाचणीचा निकाल पत्र वाटप आणि सेवा क्षेत्रातील करिअर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला होता.
या कार्यक्रमास बारावी पास झालेले शंभरहून अधिक विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यावेळी संस्थेच्यावतीने करिअर मार्गदर्शक रामदास झिरपे यांनी हवाई क्षेत्र, जहाज क्षेत्र, हॉस्पिटॅलिटी क्षेत्र, पर्यटन क्षेत्रातील वाढत्या रोजगाराच्या संधी या बद्दल विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊनही विद्यार्थ्यांना नोकरी मिळविणे अशक्य झालेले आहे. परंतु, कुशल भारत योजनेच्या माध्यमातून 2 ते 3 वर्षांच्या कालावधीत प्रशिक्षण पूर्ण करून विद्यार्थ्यांची निवड सेवा क्षेत्रात होत आहे. कारण, सेवा क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कुशल भारत योजने अंतर्गत दहावी आणि बारावी झालेले विद्यार्थी दहावी व बारावी नंतर आपले करिअर सेवा क्षेत्रात सुरू करू शकतात. जास्तीत जास्त दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यानी या संधीचा फायदा घ्यावा असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
बुद्धिमत्ता कल चाचणी व आज घेतलेला इंटेर्वीएव अंतर्गत संस्थेच्यावतीने सावंतवाडी मधील काही विद्यार्थ्यांची सेवा क्षेत्रातील करिअरसाठी निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या संस्थापिका शिरीन वस्तानी यानी अभिनंदन केले.सेवा क्षेत्रातील यशस्वी करिअरसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुर्खाडे मोरखडे , अलका लिमजे , गीतांजली पाटील यांनी योगदान दिले.