बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये करिअर मार्गदर्शन

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 10, 2024 12:33 PM
views 182  views

कणकवली : बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये  इयत्ता 8 वी, 9वी व 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात आला.

या मार्गदर्शनाकरिता रोहन परमार (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, भोपाल), अरमान नागवंशी (सिरॅमिक ग्लास डिझायनर, दिल्ली) प्रियंका कुमार (सीईओ ऑफ कंट्री साइड स्टुडिओ, जमशेदपूर), किरण कदम (फिल्म मेकिंग अँड स्टोरी रायटिंग, ता.मालवण जि.सिंधुदूर्ग) यांनी फोटोग्राफी, डिझायनिंग, वेबसाईट बनवणे, बनवलेल्या वेबासाईट चा युजर एक्सपिरीयन्स ड्रॉईंग, पेंटिंग तसेच गोष्ट वेगवेगळ्या माध्यमात कशी सांगायची यासाठी ॲनिमेशन, चित्रे, रंग याचा वापर कसा करायचा, इको फ्रेंडली लॅम्प कसे बनवायचे, कमी किमतीत प्रॉडक्ट तयार करणे, एखादा प्रॉडक्ट बनताना त्याची  प्रोसेस काय असते अशा विविध विषयाला अनुसरून मार्गदर्शन केले. डिझायनिंग च्या माध्यमातून आपल्या स्वतःच्या कल्पकतेतून आपण आपले चांगले करिअर घडवू शकतो. स्वतःमधील सृजनात्मक कलेला अनुसरून त्या दृष्टीने कष्ट केले, तर यशाचे शिखर चढणे आणि आपले उत्तम करिअर करणे सहज शक्य आहे, असे प्रतिपादन केले.

या मार्गदर्शन वर्गाला संस्थेच्या संचालिका सुलेखा राणे, संदीप सावंत सर, विनायक सापळे, मुख्याध्यापिका  कुलकर्णी मॅडम , सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.