उद्या सावंतवाडीत करिअर मार्गदर्शन शिबिर

ज्ञानज्योत करिअर इन्स्टिटयूट - सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचं आयोजन
Edited by: विनायक गांवस
Published on: May 25, 2024 13:21 PM
views 67  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्यात नीट, जेईई, तसेच एम एच सीईटी यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी अग्रगण्य समजली जाणारी पुणे येथील ज्ञानज्योत करिअर इन्स्टिटयूट,  आणि सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने रविवार २६ मे रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी शहरातील मिलाग्रीस हायस्कूल येथे एक दिवशीय करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच या कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यां व्यक्तीचा उचित सन्मान देखील केला जाणार आहे.तरी मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक, प्राध्यापक पालक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्ञानज्योत करिअर इन्स्टिटयूट पुणेचे मार्गदर्शक  प्रा. राजाराम परब हे गेले जवळपास एक दशक सिंधुदुर्ग आणि गोव्यातील वि‌द्यार्थ्यांना विज्ञान शाखेतील करिअर संदर्भात मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण देत आहेत.यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतील विविध करिअर संदर्भात माहिती साठी 26 मे रोजी, सकाळी दहा वाजता मिलाग्रीस प्रशालेत या अत्यंत पावरफुल वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.

या वर्कशॉपमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. राजाराम परब, व श्री आनंदकुमार  हे वि‌द्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या वर्कशॉपला, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच सावंतवाडी तालुक्यातील  विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ज्ञानज्योत करिअर इन्स्टिटयूट, पुणे व सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष  हरिश्चंद्र पवार व सचिव मयूर चराटकर यांनी केले आहे.